Advertisement

दुचाकी चोराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

प्रजापत्र | Tuesday, 16/06/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.१६(प्रतिनिधी): स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरट्यांवर कारवाई करत अंबाजोगाई शहरातील दोन आणि परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील एका गुन्ह्याचा उलगडा केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण सहा चोरीच्या दुचाकी असा एकूण २ लाख २० हजारांचा मुद्देमाला जप्त केला आहे.
  अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यातील व गंगाखेड पोलीस ठाणे अंतर्गत दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू होता. तपासादरम्यान पोलिसांनी संतोष बाबासाहेब मुंडे (वय २५), रा. वरवटी ता. अंबाजोगाई, ह.मु. छत्रपती कॉलनी, बायपास रोड, अंबाजोगाई शहर यास ताब्यात घेतले.चौकशीत आरोपीकडून विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या एकूण सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. यामध्ये हिरो एचएफ डिलक्स, होंडा अ‍ॅक्टिवा, हिरो पॅशन प्रो, हिरो स्प्लेंडर प्रो तसेच टीव्हीएस ज्युपिटर आदी दुचाकी वाहनांचा समावेश असून एकूण २ लाख २० हजारांचा मुद्देमाला जप्त करण्यात आला आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके , पोनि.शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि.सुशांत सुतळे,   मारुती कांबळे, रामचंद्र केकान, विष्णू सानप, गोविंद भताने,सचिन आंधळे यांनी केली.

Advertisement

Advertisement