बीड दि.३१ (प्रतिनिधी) अवैध गुटखा विक्री व वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने बीड शहर, सिरसाळा आणि युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी रविवार (दि.३१) रोजी कारवाई करत एकूण १२ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
बीड शहरातील बसस्थानकासमोर एक इसम गुटखा विक्री करताना आढळून आला तर सिरसाळा हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पवनेर ता. परळी येथे छापा टाकला. आरोपीच्या राहत्या घरातून व वाहनातून विविध कंपनीचा प्रतिबंधित पान मसाला व गुटखा जप्त करण्यात आला.तसेच युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीत एक इसम स्विफ्ट कारमधून गुटखा वाहतूक करताना आढळून असून या तीन वेगवेगळ्या ठिकाणी रविवार (दि.३१) रोजी कारवाई करत एकूण १२ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी जगन्नाथ तातेराव भरड (वय ५५),रा. पोहनेर ता. परळी, जि. बीड
यास ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने एका दिवसात तीन ठिकाणी कारवाया करून गुटखा माफियांना मोठा दणका दिल्याने जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री व वाहतुकीवर अंकुश बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सदरील कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, पोलीस उपाधीक्षक वेंकटरमन, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक खटावकर,पोह.राहुल शिंदे, आशोक दुबाले, विकास राठोड, अर्जुन यादव, पो.अं.मनोज परझने, आशपाक सय्यद व चालक पोहेकॉ नितीन वडमारे,रामचंद्र केकान, गोविंद भताने,सचिन आंधळे, पोउपनि महेश विघ्ने,श्री.जोगदंड,श्री.पठाण, श्री.गित्ते,श्री.घोडके व श्री.मराडे यांनी केली आहे.

