Advertisement

संविधानाच्या चौकटीत बसणारा कोणताही निर्णय घ्यायला तयार

प्रजापत्र | Saturday, 30/05/2026
बातमी शेअर करा

जालना :  मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या तारीख व वेळेनुसार आज (३० मे) सकाळी १० वाजता अंतरवाली सराटी रोडवरील शेतात बाज टाकून भर उन्हात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण संदर्भात विविध मागण्यासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाची मागणी वाढली लागली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली.  

'मराठा आरक्षणावर सरकार नेहमी  सकारात्मक आहे, सरकारने वारंवार निर्णय घेतला आहे. आरक्षणाच्या बाबतीत सरकारची भूमिक पारदर्शक आहे. आम्ही तिच भूमिका सातत्याने मांडतोय. आमचे सरकार सर्व समाजासाठी सकारात्मक काम करणारे सरकार आहे. आम्ही समाजाला एकमेकांपुढे आणून भांडण करत नाही. सगळ्यांचेच भले कसे होईल हा आम्ही प्रयत्न करतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मराठा समाजाच्या बाबतीत जेवढे निर्णय मी आणि एकनाथ शिंदे यांनी घेतले तेवढे इतिहासात कधीही झाले नाहीत.यापुढेही आम्ही मराठा समाजाच्या हितासाठी निर्णय घेऊ फक्त हे निर्णय घेत असताना कायद्याचे पालन करू, याचे पालन न करता जर आम्ही निर्णय घेतला तर त्यातून फक्त प्रसिद्धी मिळेल. पण, तो निर्णय टीकणार नाही. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत जे निर्णय बसतील ते निर्णय आम्ही घेणार, असेही फडणवीस म्हणाले.

" आम्ही एका समाजाचे काढून दुसऱ्या समाजाला देणार नाही. ओबीसी समाजाला घाबरण्याची आवश्यक्ता नाही. मराठा समाजाचेही समाधान करू, हे करत असताना आम्ही ओबीसी समाजावर अन्याय करणार नाही, असेही यांनी फडणवीस यांनी नमूद केले.

Advertisement

Advertisement