पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारू दारूमुळे १३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मागील ४८ तासात पुण्यात मृत्यूचे तांडव सुरू आहे. या विषारू दारू प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत या प्रकरणात ८ जणांना बेड्या ठोकल्या असून कारवाई करण्यात येत आहे.
पण १३ जणांच्या मृत्यूचे धक्कादायक कारण समोर आले आहे. आरोपी योगेश वानखेडे याने दारूमध्ये मिथेनॉल मिळवले होते, त्यामुळेच ही दुर्घटना झाल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी योगेश वानखेडेला अटक केली असून तपास करण्यात येत आहे. या प्रकरणात आणखी कुणाची नावे समोर येणार? हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.आरोपी योगेश वानखेडेने दारूमध्ये मिथेनॉल मिळवल्याने ही घटना घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. योगेश वानखेडे हा दारू वितरीत करण्याचं काम करत होता. पोलिसांनी आतापर्यंत 3 ठिकाणी कारवाई केली असून पुढील तपास करत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नलसिंह विरखा दारू गुत्त्याचा मालक आहे, त्याला बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली आहे. पुणे पोलिसांकडून या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरातील संजय नगर या ठिकाणी अवैध दारू विक्री अड्डा चालविण्यात येत होता अशी माहिती आता पोलिस तपासात समोर आली आहे. योगेश वानखेडे हा दापोडी येथील संजय नगरच्या विरका सिंग कुटुंबीयांना अवैध दारू पुरवठा करत होता. त्यानंतर त्याने पुरवठा केलेली दारू विरका सिंग कुटुंबीया आपल्या ग्राहकांना देत होते. संजय नगर या ठिकाणी वीरका सिंग कुटुंबीय मागील अनेक महिन्यापासून अवैध दारू विक्री अड्डा चालवत होते. मात्र या दारुड्याने आता अनेक घरातील करत्या पुरुषांचा जीव गेल्याने शासनाने या दुर्घटनेतील पिढी त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करून दोषवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पीडितांच्या नातेवाईकांनी केली आहे.

