Advertisement

उमेश दळवी खून प्रकरणातील आरोपीला ठोकल्या बेड्या

प्रजापत्र | Tuesday, 26/05/2026
बातमी शेअर करा

 बीड दि २६(प्रतिनिधी): शहरातील उमेश दळवी खून प्रकरणातील आरोपी शेख इरफान शेख समद उर्फ लाला याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी बालेपीरमधुन गजाआड केले आहे. तांत्रिक विश्लेशन आणि गोपनिय माहितीवरून पोलीसांनी मोठ्या शिताफीने त्यास ताब्यात घेतले असून त्याने गुन्हा केल्याची कबुलीही दिल्याचे पोलीसांनी सांगितले.
    बीड शहरातील उमेश नवनाथ दळवी या कामगाराचा मारहाणीत मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर या प्रकरणात मयताची पत्नी संगिता दळवी यांच्या तक्रारीवरून  सोमवारी सकाळी अवैध दारू विक्रेता लाला शेख याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.घटनेची गांभीर्याने दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य आरोपी शेख इरफान शेख समद उर्फ लाला याला बालेपीर येथून मंगळवार (दि.२६)रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम, व्यंकटरमण पोलीस उपाधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनि श्रीराम खटावकर, अशोक दुबाले, मनोज परजणे,राहुल शिंदे,अश्फाक सय्यद चालक नितीन वडमारे  यांनी केली.

  

Advertisement

Advertisement