मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी नेमकी कधी होणार याची तारीख आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितली आहे. येत्या ३० जून पूर्वी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे पुढच्या हंगामासाठी या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा असेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांचे कृषी संदर्भातील ८० टक्के कर्जवितरणाचे टार्गेट पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
बातमी शेअर करा

