बीड-मागेल त्याला सौर कृषी पंपासाठी नाहरकत देण्यासाठी एक हजाराची लाच घेताना महावितरणच्या अधिकाऱ्याला बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई सोमवारी दुपारी ४.३० च्या दरम्यान घडली आहे.
कृष्णा आश्रुबा पाळवदे (वय-३३) असे लाचखोराचे नाव आहे. तेलगावच्या महावितरण कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून पाळवदे नौकरीला होते.तक्रारदारकडे सौर कृषी पंपाच्या नाहरकत देण्यासाठी १ हजाराची मागणी करण्यात आली. त्यानुसार बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने चिंचोली परिसरात सापळा रचून पैसे स्वीकारताना रंगेहात कारवाई केली. यामध्ये पोलीस उपाधीक्षक सोपान चित्तमपल्ले, समाधान कवडे, पांडुरंग काचगुंडे, अनिल शेळके, अविनाश गवळी, गणेश मेहत्रे यांचा समावेश होता. दरम्यान आष्टीत महावितरणच्या अधिकाऱ्याला काही दिवसापूर्वी एसीबीने कारवाईचा शॉक दिल्यानंतर आता बीडच्या विभागातील अशीच कारवाई करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
