Advertisement

शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला

प्रजापत्र | Monday, 18/05/2026
बातमी शेअर करा

 बीड, दि.१८(प्रतिनिधी): बीड शहरा लगत असलेल्या बीड बायपास वरील इमामपूररोड येथील सर्विस रोड व स्लिप रोड ६०० मीटर वाढवण्या संदर्भात वारंवार पत्र व्यवहार करूनही काम न झाल्यामुळे बीड बायपासला महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस तथा सिनेट सदस्य अँड सुभाष राऊत, रामभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या परीसरातील सर्व शेतकरी बांधवानी लोकशाही मार्गाने सोमवार (दि.१८) रोजी सकाळी १०.०० वा. रस्ता रोको
करण्यात आला.
   सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ हा अतिशय चांगल्या दर्जाचा रस्ता सन २०१९-२० मध्ये बी.ओ.टी. तत्वावर पूर्ण करण्यात आलेला आहे. तरी हा रस्ता करत असतांना जुना सोलापूर-धुळे-मांजरसुंबा येथुन येणारा रस्ता छत्रपती संभाजी राजे चौक ते इमामपूर रोड इथपर्यंत रोडची उंची जास्त आहे व संबंधीत क्षेत्रात रोडच्या दोन्ही बाजुने शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत, त्या रोडची उंची असल्यामुळे शेती करता येत नाही. सध्या इमामपूर रोडला स्लिप रोड व सींस रोड मंजूर असून त्याचे काम चालू आहे, तसेच छत्रपती संभाजी राजे चौक बार्शी रोड येथे पण स्लिप रोड व सव्हींस रोड मंजूर असून त्याचे पण काम चालू आहे. याच रोडवर समनापूर कडे जाणारा २० फुटाचा रस्ता आहे, इमामपूर रोड ते छत्रपती संभाजी राजे चौक या स्लिप रोडला जर ६०० मीटर आंतर वाढवले तर शेतकऱ्यांना शेती करण्यास व कोल्हारवाडी, समनापूर, इमामपूर, शिंदे वस्ती या गावांना याचा फायदा होईल. यासाठी वारंवार या संदर्भात पत्र व्यवहार करून सुध्दा यावर लक्ष दिले नाही, म्हणून आज या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी सोमवार दि. १८ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता बीड बायपास वरील संबंधीत जागेवर रस्ता भव्य रोको आंदोलन केले याबाबत मा. प्रकल्प सचांलक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण छञपती संभाजीनगर यांना निवेदन देण्यात आले असून या भव्य रस्ता रोकोस महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस तथा सिनेट सदस्य ड. सुभाष राऊत, रामभाऊ शिंदे, वामन लिंबाजी शिंदे, दिगंबर तुलसीराम शिंदे, अंकुश तुळशीराम शिंदे, मच्छिंद्र बाबुराव वाणी, रवींद्र मच्छिंद्र माने, जयदीप पांडुरंग पवार, भगवान लिंबाजी शिंदे, प्रविण पालीमकर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते .

 

Advertisement

Advertisement