बीड दि.८(प्रतिनिधी): शहरातील खंडेश्वरी परिसरातील साईनगर येथे तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना शुक्रवार (दि.८) रोजी सकाळी सुमारे उघडकीस आली.
वैभव दीपक बुरांडे (वय २९) रा. साईनगर, आकाशवाणी पेठ, बीड असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मजुरीचे काम करत होता. वैभव याने राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले. घटनेनंतर त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वैभव हा मनमिळावू स्वभावाचा असल्याने परिसरात परिचित होता. त्याच्या पश्चात आई, बहीण व भाऊ असा परिवार आहे.
बातमी शेअर करा

