Advertisement

परळीत कपड्याच्या मॉलला भीषण आग

प्रजापत्र | Wednesday, 29/04/2026
बातमी शेअर करा

परळी दि.२९(प्रतिनिधी): शहरातील अत्यंत गजबजलेल्या राणी लक्ष्मीबाई टावर परिसरातील 'रेझिंग' या कपड्याच्या मॉलला आज दुपारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली असून यात लाखोंचे नुकसान झाले आहे.

परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टावर परिसरातील 'रेझिंग' या कपड्याच्या मॉलला बुधवारी (दि.२९) रोजी दुपारी भीषण आग लागली. आगीत आतील मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र,ही आग विझवण्यासाठी नगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी तब्बल ४० ते ५० मिनिटे उशिरा पोहोचल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.आग लागल्यानंतर तब्बल ५० मिनिटे उलटून गेल्यावर घटनास्थळी अग्निशामक दलाची गाडी पोहोचली, मात्र धक्कादायक बाब म्हणजे ही गाडी नगरपरिषदेची नसून थर्मल पॉवर स्टेशनची होती. शहरात स्वतःची यंत्रणा उपलब्ध असतानाही ती वेळेत न पोहोचणे, हे प्रशासनाच्या गंभीर निष्काळजीपणाचे द्योतक ठरत आहे.

Advertisement

Advertisement