बीड-येथील कपिलधारवाडी-पाली ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत अखेर गणेश नवले यांच्या पत्नी राणी नवले निवडणुकीत बहूमतांनी विजयी झाल्या आहेत. गावातील नागरिकांनी यंदा गणेश नवलेंच्या पत्नीच्या गळ्यात सरपंचपदाची माळ घातल्याने पालीत आनंदउत्सव साजरा करण्यात येत आहे.
कपिलधारवाडी-पाली ग्रामपंचायतवर अविश्वास ठराव आणून सरपंच पदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम लागला होता.मंगळवारी मतदान झाल्यानंतर बुधवारी मतमोजणी पार पडली.यावेळी तब्बल ४१६ मतांनी राणी नवले यांनी विजय संपादन केला.गणेश नवले यांनी गावात मागच्या अनेक वर्षापासुन समाज कार्य केले होते.त्यांच्या या कार्याची दखल घेत यंदा त्यांच्या पत्नीला सरपंचपदाचा बहुमान मिळाला असल्याचे चित्र आहे.
बातमी शेअर करा

