Advertisement

 वाल्मिक कराडची बदनामी करायची म्हणून मी दबावापोटी खोटी माहिती दिली'

प्रजापत्र | Thursday, 23/04/2026
बातमी शेअर करा

बीड दि.२३(प्रतिनिधी): येथील जिल्हा कारागृह वर्ग-२ मध्ये आरोपी असलेल्या प्रतिक घुले याने प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यातील आरोपी अझहर अब्दुल रहेमान पठाण याला जागेच्या वादातून मारहाण केल्याचा दावा करताना मनोज जरांगे यांच्या हत्यासाठी देखील सुपारी दिल्याचा दावा करणारी कथित ऑडिओ रेकॉर्डिंग काल व्हायरलं झाली होती.यानंतर समाजमाध्यमातून अनेक प्रतिक्रिया उमटल्यानंतर आता या रेकॉर्डिंगचा दुसरा भाग व्हायरल होतं आहे. विशेष म्हणजे  अझहर अब्दुल रहेमान पठाण या व्यक्तीने जिल्हा कारागृह अधिक्षक यांच्याकडे अर्ज करून कारागृह कर्मचारी दीपक पाटील, आरोपी सनी आठवले आणि परभने नामक व्यक्तीने दबाव टाकून वाल्मिक कराडची बदनामी करण्यासाठी भाग पाडले असे देखील सांगितल्याचे कळते. मस्साजोगच्या निवडणुकीत सहानुभूती मिळावी यासाठी दादा खिंडकर याचा निरोप असून तू खोटी माहिती दे असे आपल्याला दबावातून घेऊन सांगण्यात आल्याचे आरोपीने म्हटल्याने बीडचे कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
    अझहर अब्दुल रहेमान पठाणने कारागृह अधिक्षक यांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे,२१ एप्रिल २०२६ रोजी बॅरेक क्रमांक ६ मध्ये माझी व प्रतिक घुलेची शाब्दिक चकमक झाली होती.हा वाद लगेच आपापसात मिटला देखील होता.परंतु मला जेलचे कर्मचारी दीपक पाटील, बंदी सनी आठवले,बंदी परभने यांनी बोलावून दमदाटी करत दबाव आणला. आणि बाहेर फोन लावून आम्ही सांगतोल तसे बोल असा निरोप दिला. त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त वाल्मिक कराडची बदनामी करायची असून मस्साजोगची ग्रामपंचायत निवडणूक २-३ दिवसांवर आली आहे.तिथे दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी उभा असून मतदान होईपर्यंत आपल्याला बदनामी चालू ठेवायची आहे. दादा खिंडकर याने आपल्याला असा निरोप दिल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.दरम्यान वरील तिघांनी आपल्याला दबाव आणून खोटी माहिती देण्यासाठी भाग पाडले असून यात कराड असेल किंवा मनोज जरांगे यांच्या बाबतीत कोणतीही माहिती खरी नव्हती असा देखील दावा ऑडिओ रेकॉर्डिंगमधून करण्यात आला आहे.

  

अहवाल वरिष्ठाना पाठविला 
बीडच्या कारागृहामध्ये घडलेला प्रकार किरकोळ स्वरुपाचा होता. आम्ही सिसिटीव्हीची देखील पाहणी केली आहे. या घटनेत अझहर अब्दुल रहेमान पठाण याने आपली कोणतीही तक्रार कराड गँगबद्दल नसल्याचे लेखी स्वरूपात म्हटले आहे. तक्रारदाराचा दुसरा अर्ज देखील आला असून या घटनेतील दोषीचे नावे न्यायालय आणि जेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहेत. लवकरच यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचेनुसार कारवाई करणार आहोत अशी प्रतिक्रिया कारागृह अधिक्षक रामराजे चांदणे यांनी प्रजापत्रशी बोलताना दिली.

 

Advertisement

Advertisement