Advertisement

पेठ बीड मध्ये गुटख्याच्या साठ्यावर छापा

प्रजापत्र | Monday, 13/04/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.१३(प्रतिनिधी):शहरातील पेठ बीड परिसरातील बाबा चौक, इस्लामपुरा येथील गुटख्याच्या साठ्यावर पेठ बीड पोलीस ठाण्याच्या डी.बी पथकाने रविवार (दि.१२) रोजी कारवाई करत ६४,८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

   पोलीस उपनिरीक्षक मन्सूर शहा यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि बाबा चौक इस्लामपुरा येथे अफरोज तांबोळी याने स्वतःच्या फायद्यासाठी  गुटख्याचा साठा केला असून सदरील ठिकाणी डी.बी पथकाने रविवार (दि.१२) रोजी कारवाई करत ६४,८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.आरोपी अफरोज तांबोली हा फरार झाला असून त्याच्या विरोधात पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि मन्सूर शहा, पोलीस हवालदार नितेश माने  पो.अं.गिरी व राख यांच्या पथकाने केली.

 

Advertisement

Advertisement