Advertisement

गावठी पिस्टलसह एक इसम जेरबंद

प्रजापत्र | Saturday, 11/04/2026
बातमी शेअर करा

बीड दि.११(प्रतिनिधी ): बीड जिल्ह्यात सध्या विनापरवाना गावठी पिस्टल वापरत असल्याचे चित्र दिसत आहे. बीड गावठी बनावटीची पिस्टल बाळगणाऱ्या एका इसमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून शुक्रवार (दि.१०) रोजी रात्री जेरबंद केले आहे.  

     सोमनवाडी शिवारातील एका धाब्यावर विलास अंकुश चाटे हा गावठी पिस्टल बाळगत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने रात्री सुमारे ९ च्या सुमारास संबंधित धाब्यावर छापा टाकला. छाप्यात विलास चाटे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून सुमारे ४० हजार रुपये किंमतीची गावठी बनावटीची पिस्टल जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी बर्दापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   स्थानिक गुन्हे शाखेने सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी बर्दापुर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सादरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार गोविंद भताने, रामचंद्र केकान, मारोती कांबळे, विष्णु सानप, तसेच पोलीस अंमलदार सचिन आंधळे, विकी सुरवसे, अतुल हराळे,विकास राठोड यांनी केली.

Advertisement

Advertisement