बीड दि.११ (प्रतिनिधी): सध्या जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने इंधनपुरवठ्यावर परिणाम होत असून देशभरात गॅस सिलेंडरची टंचाई जाणवत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी ग्राहकांना सिलेंडरसाठी रांगा लावाव्या लागत असताना बीडमधील भारत गॅसचे वितरक असलेल्या 'केसोना' गॅस एजन्सीने मात्र ग्राहकांचा विश्वास कायम ठेवत टंचाईच्या काळातही सेवा सुरळीत ठेवत बुकिंग नंतर घरपोच सेवा देत ग्राहकांना आधार दिला आहे.
मागील काही दिवसांपासून सर्वत्रच गॅस सिलेंडरची कमतरता भासत असताना 'केसोना' एजन्सीने नियोजनबद्ध कामकाज करत ग्राहकांची गरज प्राधान्याने पूर्ण केली. आपत्कालीन परिस्थितीतही एजन्सीने वितरणात खंड पडू न देता वेळेवर सेवा दिल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व कामगार वर्गासाठी घरपोच सेवा प्रभावी ठरत आहे. एजन्सीकडून घरपोच वितरणासाठी सक्षम व सुव्यवस्थित यंत्रणा उभारण्यात आली असून प्रत्येक ग्राहकाला वेळेवर आणि सुरक्षित सेवा मिळावी यासाठी विशेष दक्षता घेतली जाते. बुकिंगपासून ते वितरणापर्यंतची प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यात आल्याने ग्राहकांचा विश्वास वाढला आहे. नियोजनामुळे ‘केसोना’ गॅस एजन्सी ही परिसरातील नागरिकांची पहिली पसंती ठरत असून संकटकाळातही विश्वासार्ह सेवा देणारी एजन्सी म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
मधल्या काळात गॅस ग्राहकांच्या केवायसीकडे अनेकांचे दुर्लक्ष होते , मात्र 'केसोना' भारत गॅसने मोठ्या प्रमाणावर केवायसी केली होती, त्यामुळे देखील केसोनाच्या ग्राहकांना बुकिंग आणि इतर बाबतीत अडचणी आल्या नाहीत, परिणामी कोणत्याही कटकटींशिवाय केसोनाच्या ग्राहकांना गॅस मिळाल्याने त्यांच्यात 'आनंदा' चे वातावरण आहे.

प्रजापत्र | Saturday, 11/04/2026
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
