बीड दि.६(प्रतिनिधी): राज्यात महापुरुषांच्या नावाखाली अनाधिकृत पुतळे व स्मारके उभारण्याचे प्रकार वाढत असून, त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर दोषींवर कठोर कारवाई करावी या प्रमुख मागण्यांसाठी सोमवार (दि.६) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
राज्यात महापुरुषांच्या नावाखाली अनाधिकृत पुतळे व स्मारके उभारण्याचे प्रकार वाढत असून, त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर दोषींवर कठोर कारवाई करावी आणि शासनाच्या पुतळा धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी सोमवार (दि.६) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात शेख युनुस, मुबीन शेख,बाळासाहेब मोरे, माजी सैनिक अशोक येडे,रामधन जमाले, किस्किंदा पांचाळ यांची उपस्थिती होती.

