नाशिक: दिंडोरी तालुक्यात खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून घरी निघालेली लहान मुले आणि त्यांच्या पालकांची एक गाडी परिसरातील विहिरीत कोसळल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री समोर आला आहे. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी रस्त्याच्या मध्यभागी किंवा रहदारीच्या ठिकाणी असलेल्या अशा धोकादायक विहिरींचे ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती दिली.
बातमी शेअर करा

