Advertisement

दारूची वाहतूक करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

प्रजापत्र | Saturday, 04/04/2026
बातमी शेअर करा

 केज दि.४ (प्रतिनिधी): केज- कळंब रोडवर माळेगांव येथील चौकात पोलिसांनी अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या इसमाला शुक्रवार (दि.३) रोजी रात्री कारसह ताब्यात घेत ५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

     सहाय्यक पोलिस अधीक्षक श्री.व्यंकटराम यांना माहिती मिळाली कि केज ते कळंब रोडने स्विफ्ट डिझायर गाडीतून देशी व विदेशी दारूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच त्या ठिकाणी  जात सदरील स्विफ्ट डिझायर व्हिडीआय (एम एच-१२/ई एक्स-३५१९) ही कार केज तालुक्याती माळेगांव येथील चौकात सापळा लावून थांबविली. तिचा चालक श्रीकृष्ण गोरख राख याला ताब्यात घेऊन पंचासमक्ष गाडीची झडती घेतली असता कारमध्ये ८८ हजार रु. देशी दारू आणि ७१ हजार ८६० रु ची विदेशी दारु बेकायदेशीर व अवैध्यरीत्या दारू वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी १ लाख ५९ हजार ८६० रु. ची देशी विदेशी दारु आणि चोरटी दारू वाहतूक करणारी कार असा एकूण ५ लाख ५९ हजार ८६० रु. चा मुद्देमाल ताब्यात घेत धाडसी कारवाई केली आहे. सदरील कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.विकास चोपणे,शिवाजी कागदे,अशपाक इनामदार,सिद्दिक शहा यांनी केली.

 

Advertisement

Advertisement