माजलगाव दि.३ (प्रतिनिधी): शहराजवळील धरण परिसरात आज (दि.३) एप्रिल रोजी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. धरणातील फिल्टर पंपाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सकाळच्या सुमारास काही नागरिकांना हा मृतदेह दिसून आला, त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच माजलगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे. प्राथमिक तपासात मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून,शवविच्छेदन अहवालानंतरच याबाबत अधिक माहिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे पोलिसांकडून ओळख पटविण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. आसपासच्या परिसरातील नागरिकांकडूनही माहिती घेतली जात आहे, तसेच हरवलेल्या व्यक्तींच्या नोंदींचीही पडताळणी केली जात आहे. मृत व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे सदर व्यक्तीच्या डाख्या हातावर अंगठ्याच्या बाजूला 's ' असे गोंदलेले आहे. अंगावर निळ्या रंगाचा पांडच्या ठिपक्याचा टी-शर्ट असून काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेली आहे. उजव्या हातात लाल दोरा बांधलेला असून दीन्ही कानांना मुरड घातलेली आहे. वा वैशिष्यांवरून ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण आले असून, नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र, पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलं आहे. या अनोळखी व्यक्तीबाबत कोणालाही काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ माजलगाव पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास माजलगाव पोलिसांकडून सुरू आहे.

