Advertisement

मोक्का,चैनस्नॅचिंग प्रकरणातील फरार आरोपींना ठोकल्या बेड्या

प्रजापत्र | Tuesday, 31/03/2026
बातमी शेअर करा

बीड दि.३१ (प्रतिनिधी): चैनस्नॅचिंग प्रकरणातील फरार असलेले दोन आरोपी परळी येथील ईराणी वस्तीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच शनिवार (दि.२८) रोजी पहाटे कारवाई करत त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

      कंबर उर्फ डंम्बर शहाजहान ईराणी (वय ४५) व हसनैन बरकतअली मिर्झा बेग उर्फ ईराणी (वय २०) या दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले.सदरील   आरोपी परळीतील ईराणी गल्ली परिसरात राहत असल्याचे निष्पन्न झाले होते.आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी धारूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यासह आष्टी व शिवाजीनगर पोलीस ठाण्यांतील प्रत्येकी एक अशा एकूण तीन गुन्ह्यांची कबुली दिली. विशेष म्हणजे आरोपींपैकी एक जण ठाणे जिल्ह्यातील मोक्कागुन्ह्यात फरार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींकडून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्या चौकशीतून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी धारूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहा.पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि शिवाजी बंटेवाड, पोनि धनजंय ढोणे (प्रभारी संभाजीनगर परळी), पोउपनि श्रीराम खटावकर, सुशांत सुतळे, पो.ह.मारूती कांबळे, सचिन सानप, रामचंद्र केकान, गोविंद भताने, आनंद मस्के, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, राहुल शिंदे, गोविंद राख, विकास राठोड, स्वाती मुंडे व पो.अं.सचिन आंधळे, अर्जन यादव, अलीम शेख, बिभीषण चव्हाण, विकी सुरवसे व चालक नितीन वडमारे, अतुल हराळे, सिध्देश्वर मांजरे यांनी केली.

Advertisement

Advertisement