Advertisement

बारगजवाडीत मध्यरात्री चोरट्यांनी फोडले घर 

प्रजापत्र | Thursday, 26/02/2026
बातमी शेअर करा

  शिरूर कासार दि.२६(प्रतिनिधी):तालुक्यातील बारगजवाडी येथील घराची भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण १,६८,२१० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवार (दि.२२)रोजी मध्यरात्री घडली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
     शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.शिरूर कासार तालुक्यातील बारगजवाडी येथील रहिवाशी असलेल्या द्रोपदाबाई बाळासाहेब मिसाळ (वय ७०) ह्या व त्यांचे पती जेवण करून रविवार (दि २२) रोजी रात्री १० च्या सुमारास घरासमोरील पडवीत मागच्या घराला कुलूप लावून झोपले असता मध्यरात्री त्यांच्या घराची भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील चार ग्रॅमचे वेलजोड अंदाजे किंमत ३३६१०,एक ग्रॅमचे हुजूर जोड अंदाजे किंमत ७६००, दोन ग्रॅमचे ४९ मणी अंदाजे किंमत १५४००,दिड ग्रॅमची बुगडी अंदाजे किंमत ११६०० व १,००,००० लाख रुपये रोख रक्कम असा एकूण १,६८,२१० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवार (दि.२३) रोजी सकाळी ०६ च्या सुमारास मिसाळ दाम्पत्याच्या निदर्शनात आली.त्यानंतर शिरूर पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती देत अज्ञात चोरट्यांविरुद्ध शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास पो.अं.एस.जी.खाडे हे करत आहेत.

Advertisement

Advertisement