Advertisement

 प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनास भाविकांची मोठी गर्दी 

प्रजापत्र | Monday, 11/08/2025
बातमी शेअर करा

 परळी वैजनाथ दि.११ (प्रतीनिधी ):  येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी तिसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे .मंदिरात विविध फुलांची मनमोहक आकर्षक अशी सजावट करण्यात आली असून मध्यरात्री बारा वाजल्यापासून दर्शनासाठी भाविकांची रांग लागली आहे. 

      वैद्यनाथ मंदिरात श्रावण सोमवारच्या अनुषंगाने महिला व पुरुष अशी धर्मदर्शन रांग व पासधारक अशा स्वतंत्र तीन रांगा लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिवभक्तांचे दर्शन शांततेत होत आहे.  वैद्यनाथ मंदिर परिसरात पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला पोलिस होमगार्ड, राज्य राखीव दल, असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धर्मदर्शन रांगेमध्ये दोन तासाच्या आत दर्शन होत आहे तर पासच्या रांगेमध्ये एक तासाच्या आत दर्शन होत असल्याचे भाविकांनी सांगितले. श्रावण सोमवारी निमित्त माजी मंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने श्री वैद्यनाथ मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. राज्यातून तसेच परराज्यातील भाविक दर्शनासाठी परळीत दाखल झाले आहेत.   

Advertisement

Advertisement