भारतातून टेनिस विश्वाला हादरवणारी एक दु:खद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय टेनिसची उदयोन्मुख खेळाडू २५ वर्षांची राधिका यादव हिची तिच्याच वडिलांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली.
भारतातील टेनिस जगतातून एक धक्कादायक बातमी आली आहे. गुरुवारी हरियाणातील गुरुग्राममध्ये टेनिसपटू राधिका यादवची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे वडिलांवर हत्येचा आरोप करण्यात आला आहे आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास २५ वर्षीय टेनिस खेळाडूच्या वडिलांनी तिला गोळी मारली. टेनिस खेळाडू तिच्या कुटुंबासह येथील सेक्टर ५७ मधील पहिल्या मजल्यावर राहत होती. तीन वेळा गोळ्या झाडल्यानंतर, राधिकाला गंभीर अवस्थेत एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोशल मीडियावर रील बनवल्याबद्दल वडील राधिकावर रागावले होते. ज्यामुळे तिला गोळ्या झाडून मारले अशी प्राथमिक माहिती समोर आले आहे.राधिका ही एक प्रसिद्ध राज्यस्तरीय खेळाडू होती. तिने अनेक पदके जिंकली होती. ती एक टेनिस अकादमी देखील चालवत होती, जिथे ती इतर मुलांना टेनिस शिकवत असे. टेनिस खेळाडूची हत्या का करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.गुरुग्राम सेक्टर ५६ च्या पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना गुरुवारी सकाळी माहिती मिळाली की २५ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मुलीच्या काकांशी बोलले, पण त्यांनी काहीही सांगितले नाही. घटनास्थळीच पोलिसांना कळले की मुलीच्या वडिलांनी तिला गोळी मारली आहे. महिलेला तीन गोळ्या लागल्या होत्या. पोलिसांनी हत्येत वापरलेले रिव्हॉल्व्हर जप्त केले आहे.