Advertisement

उमाकिरणच्या पवार, खाटोकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी

प्रजापत्र | Sunday, 29/06/2025
बातमी शेअर करा

 बीड दि.२९(प्रतिनिधी):अल्पवयीन (Beed)विद्यार्थिनीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले विजय पवार आणि प्रा प्रशांत खाटोकर या दोघांना रविवार (दि.२९)रोजी न्यायालयाने दोन दिवसांची (Crime)पोलीस कोठडी सुनावली आहे .

 

      या दोन्ही आरोपीना (Beed)न्यायालयात रविवार (दि.२९)रोजी दुपारी दीडच्या सुमारास हजर करण्यात आले. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आरोपीच्या वतीने ऍड बाळासाहेब कोल्हे यांनी बाजू मांडली. यावेळी पोलिसांनी मोबाईल रिकव्हर करण्यासाठी पोलीस (Police)कोठडीची मागणी केली. यावेळी न्यायालयाने १ जुलै पर्यंत कोठडी सुनावली.
 

Advertisement

Advertisement