बीड दि.२३ (प्रतिनिधी): तालुक्यातील (Beed)मौज येथील एक शेतकरी कुटूंब शेतात जाण्यासाठी शिवरस्ता उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी सोमवार (दि.२३) रोजी सकाळी ११ च्या सुमारापासून शेतामध्येच (Farmer)आमरण उपोषणाला बसले आहेत.
बीड (Beed)तालुक्यातील मौज येथील दिलीप दिनकरराव डावकर व भारत दिनकरराव डावकर यांना शेतामध्ये जाण्यास रस्ता उपलब्ध नाही.मौज शिवारातील गट नं.१४७ या शेतामध्ये रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी गावकर्यांनी अनेकवेळा महसुल प्रशासनाकडे केली. मात्र याची दखल महसूल प्रशासन घेत नसल्याने आज सोमवार (दि.२३) रोजी सकाळी ११ च्या सुमारापासून चक्क डावकर कुटूंबिय शेतामध्येच आमरण उपोषणाला बसले आहेत.
बातमी शेअर करा