Advertisement

बसस्थानकातून महिलेचे गंठण लंपास 

प्रजापत्र | Saturday, 21/06/2025
बातमी शेअर करा

 मांजरसुंबा दि.२१(वार्ताहार):तालुक्यातील (Beed)मांजरसुंबा बसस्थानकातून अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनीगंठण लंपास केल्याची घटना रविवार (दि.८) रोजी रात्री ८:३० च्या सुमारास घडली असून  एकूण ८५,००० रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

        बीड जिल्ह्यात (Crime)चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.सुमित्रा विलास कुटे (वय ७०) रा.श्रीरामनगर बीड ह्या मांजरसुनबा बसस्थानकात बसची वाट पाहत थांबल्या असता त्यांच्या गळ्यातील २१ ग्रॅमचे वजनाचे मिनीगंठण अंदाजे किंमत ८५,००० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी रविवार (दि.८) रोजी रात्री ८:३० च्या सुमारास लंपास केल्याची घटना घडली असून सुमित्रा  कुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवार (दि.१९) रोजी नेकनूर (Police)पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत. 

Advertisement

Advertisement