Advertisement

 जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून दुचाकी लंपास 

प्रजापत्र | Friday, 20/06/2025
बातमी शेअर करा

 बीड दि.२०(प्रतिनिधी):शहरातील (Beed)नगर रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून मंगळवार (दि.१७) रोजी १२.३० च्या सुमारास भरदुपारी अज्ञात चोरटयांनी दुचाकी लंपास केल्याची घटना घडली असून अज्ञात चोरट्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

      वसंत दादाराव ढेकळे (वय ३५) रा.तीप्पटवाडी ता.जी.बीड यांची हिरो होंडा स्पेलडर प्लस कंपनीची दुचाकी क्रमांक एमएच २३ बीए १०६२ हि शहरातील नगर रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावली असता मंगळवार (दि.१७) रोजी १२.३० च्या सुमारास भरदुपारी अज्ञात चोरटयांनी दुचाकी लंपास केल्याची घटना घडली असून ३०००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्या प्रकरणी वसंत ढेकळे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (दि.१९) गुरुवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील (Beed police) तपास पोलीस करत आहेत

Advertisement

Advertisement