Advertisement

मेरिटपेक्षा 'शिफारशी'वालेच ठरले एलसीबीत सरस?

प्रजापत्र | Friday, 20/06/2025
बातमी शेअर करा

बीड दि.२०(प्रतिनिधी): पोलीस अधिक्षक(Beed police) नवनीत कॉवत यांनी जिल्ह्याच्या पोलीस दलातील बदल्यांमध्ये सुरुवातीच्या याद्यात आदर्श वस्तूपाठ घालून दिला होता.त्या बदल्यांमध्ये कोणत्याही प्रकारची शिफारस किंवा वशिलेबाजी चालली नव्हती.त्यामुळे (LCB)एलसीबीत नव्या कर्मचाऱ्यांना केवळ 'मेरिट' वरच संधी मिळेल असे वाटतं असताना आता बदल्यांच्या यादीवरून तर मेरिटपेक्षा अधिक शिफारशीवालेच पोलीस (Police)कर्मचारी एलसीबीत आल्याचे चित्र आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी सुचविलेल्या कर्मचाऱ्यांना होकार देतं त्यांची एलसीबीत नियुक्ती करण्यात आली असून कामकाजावर आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या नगण्य असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. दरम्यान मनाशी मोठी आशा अन अपेक्षा बाळगून राहिलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा यावेळी हिरमोड झाला असे म्हणायला देखील हरकत नाही.
   पोलीस (Beed police)अधिक्षक नवनीत कॉवत यांनी गुरुवारी (दि.१९) एलसीबीतील कर्मचाऱ्यांच्या संदर्भाने मुलाखती घेतल्या. यावेळी कॉवत यांनी प्रत्येकांच्या कामगिरीची माहिती जाणून घेत त्यांच्याशी चर्चा केली. पहिल्यांदाच एवढ्या मोठया प्रमाणात कर्मचारी मुलाखतीसाठी आले आणि प्रत्येकाने आपली कामगिरी चांगली असल्याचे देखील घटक प्रमुखांना सांगितल्याने या याद्या दोन दिवसांत अंतिम होतील असे अंदाज बांधण्यात येतं होते. मात्र रात्रीच या याद्या जाहीर झाल्या. यात ज्या कर्मचाऱ्यांच्या आताच बदल्या झाल्या होत्या त्यांच्या पुन्हा बदल्या करून त्यांना एलसीबीत आणण्याचा घाटा घातला गेला आहे.याशिवाय(Gramin police) ग्रामीण पोलीस ठाण्यात ज्यांच्यावर 'लाखमोलाची' जबाबदारी होती ते ही कर्मचारी एलसीबीत आल्याचे पाहायला मिळत आहे.पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या नावापैकीच बहुतांश कर्मचारी एलसीबीत आल्याच्या चर्चा सुरु झाल्यामुळे आता शिफारशीवालेच एलसीबीत(LCB) अधिक सरस ठरले आहेत अस म्हणायला वावगे नाही
.

Advertisement

Advertisement