Advertisement

लाडेवडगाव शिवारात दरोडा

प्रजापत्र | Thursday, 19/06/2025
बातमी शेअर करा

 केज दि.१९(प्रतिनिधी): तालुक्यातील (Kaij)लाडेवडगाव शिवारात एका वयोवृद्ध दांपत्याच्या शेतातील शेडमध्ये घुसून चार चोरट्यांनी तब्बल ७३ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना मंगळवार (दि.१७)रोजी मध्यरात्री घडली (Crime)या घटनेत महिलेचा कान फाटून त्यांना गंभीर इजा झाली आहे.

       

       समाबाई तुकाराम लाड (वय ८०) ह्या मागील दोन(Kaij) दिवसांपासून त्या आपल्या पतीसोबत लाडेवडगाव शिवारातील अडीच एकर शेतात, पत्र्याच्या शेडमध्ये राहत होत्या.मंगळवार (दि.१७) च्या रात्री १ ते २ च्या सुमारास शेडबाहेर झोपलेल्या त्यांच्या पतीला काही अनोळखी व्यक्तीने शिवीगाळ करत झोपेतून उठवले. आवाज ऐकून समाबाई यांनी आतून आवाज दिला असता, त्यातल्याच एकाने दरवाजाला लाथ मारून आत प्रवेश केला. (Crime)यावेळी समाबाई माझा मुलगा फौजी आहे, त्याला फोन लावते असे म्हणाल्या. मात्र त्या चोरट्याने त्यांचा मोबाईल हिसकावून घेत तुमच्यासोबतच्या दोन लहान मुली कुठे आहेत? असे विचारले. त्यावर घाबरलेल्या समाबाई यांनी ते दोघेच तिथे राहत असल्याचे सांगितले.चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ५ ग्रॅमचे मंगळसूत्र, नाकातील ३ ग्रॅमची नथ आणि कानातील ४ ग्रॅमचे फुले, एक साधा मोबाईल असा एकूण ७३ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेतला. एक कानातील फुल निघत नसल्याने जबरदस्ती करताना समाबाई यांचा कान फाटून गंभीर जखम झाली आहे.त्यानंतर चारही चोरटे लोखंडी गेटवरून उड्या मारत अंबाजोगाईच्या दिशेने पायी निघून गेले. सर्वांनी चेहऱ्यावर कपडे बांधलेले असल्याने ओळख पटली नाही, मात्र दोघे सडपातळ तर उर्वरित मध्यम शरीरश्रुष्टिचे होते, अशी माहिती त्यांनी दिली. या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

Advertisement

Advertisement